Temba Bavuma: सामन्यात दुर्दैवाने आम्ही...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?
Temba Bavuma: इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय.
Temba Bavuma: वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमला देखील भारताचा विजयी रथ रोखता आलेला नाही. ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 243 रन्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम इंडियाचा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील हा सलग 8 वा विजय होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) चांगलाच संतापलेला दिसला.
इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय.
लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?
भारताविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा म्हणाला, “आम्हाला माहित आहे की, हे आव्हान होतं. पाठलाग करताना आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. माझी आमच्या फलंदाजांशी चर्चा झाली. त्यांनी पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 90 रन्स केले. त्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केली आणि रोहित शर्माने सुरु केलेल्या रनरेटवर आम्ही कंट्रोल ठेवला.
टेम्बा पुढे म्हणाला की, त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली पार्टनरशिप झाली. आम्हाला जसा संशय होता तशीच विकेट होती. दुर्दैवाने आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही. पण संभाव्यपणे आम्ही सेमीफायनलमध्ये खेळू शकतो.
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
कोलकता ईडन गार्डन्सवर भारताने टॉस जिंकला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने यावेळी फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रोहित आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये रोहित तर 11 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल देखील फिरकीच्या जाळ्यात अडकला. श्रेयस अय्यर आणि विराटने साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. अय्यरने 77 धावांची विराट खेळी केली. मात्र, विराटने शतक ठकलं. जडेजाने 15 बॉलमध्ये 29 रन्सची वादळी खेळी केली आणि टीम इंडियाला 326 रन्सवर पोहोचवलं.
83 वर दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला
भारतासमोर 327 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा टीम भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे फ्लॉप ठरली. दक्षिण आफ्रिका 27.1 ओव्हर्समध्ये केवळ 83 रन्सवर गारद झाली. भारताकडून रवींद्र जडेजाने 5, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 आणि सिराजने 1 विकेट घेतला.