Sachin Tendulkar Became An Actor From Cricketer To Save Income Tax: इन्कम टॅक्स... नोकरदार वर्गाला आणि त्यातही मध्यमवर्गीय वर्गाला तसं म्हणायला गेल्यास छळणारे शब्द. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी इन्कम टॅक्ससंदर्भात (Income Tax) सर्वसामान्यांना थोडा दिलासा दिला. खरं तर इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी (To Save Income Tax) मध्यमवर्गीयांना वेगवेगळ्या गोष्टींची मदत घ्यावी लागते. अगदी गुंतवणूक करण्यापासून ते कर सवलतीसाठी इतरही बऱ्याच गोष्टींचा पर्याय मध्यमवर्गीय निवडतात. बरं अशाप्रकारे तडजोड केवळ मध्यमवर्गीय लोक करतात अशातील गोष्ट नाही. प्रत्येकजण आपल्या कमाईवर कमीत कमी कर लागावा यासाठी प्रयत्न करत असतो, मग ती व्यक्ती मध्यमवर्गीय असो किंवा उच्च उत्पन्न स्तरातील असो. यासंदर्भातील उदाहरण घ्यायचं झालं तर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) बोलता येईल.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सारं प्रकरण 2011 चं आहे. सचिनने अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून 5.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. टॅक्स वाचवण्यासाठी सचिनने आयकर कायद्याअंतर्गत सेक्शन 80 आरआरअंतर्गत 1.77 कोटींच्या करसवलतीसाठी दावा केला होता. या नियमानुसार, जर एखादा अभिनेता आपल्या कामाच्या माध्यमातून परदेशामधून कमाई करत असेल तर त्याला एकूण कमाईपैकी काही टक्के कमाईवर करसवलत दिली जाते.


अभिनय हे मुख्य काम


सचिनने आयकरसंदर्भातील आपल्या दाव्यामध्ये त्याने ही कोट्यावधीची कमाई जाहिराती आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून केल्याचं म्हटलं होतं. या कमाईचा क्रिकेट खेळण्यासाठी थेट संबंध नसल्याचं सचिनने म्हटलं होतं. सचिनने आपल्या या कमाईसाठी आपलं मुख्य काम हे क्रिकेट खेळणं नसून अभिनय हे असल्याचंही म्हटलं होतं.


दावा झाला मान्य कारण...


सचिनने दिलेल्या स्पष्टीकरणावर टॅक्स ट्रिब्युनलने सचिन अभिनेता असल्याचा दावा स्वीकारला होता. या माध्यमातून सचिनला करसवलत मिळाली होती. ट्रिब्युनलने सचिनचा दावा मान्य करताना त्याला कॅमेरा आणि लाइटसमोर काम करावं लागतं, जे एका अभिनेत्याचं काम आहे असा तर्क लावला होता. 


सर्वाधिक कर भरणारा खेळाडू


विशेष म्हणजे सचिन केवळ करसवलत मिळवायचा असं नाही. तर 2010 मध्ये तो सर्वाधिक कर भरणा करणारा खेळाडू होता.


मोठी करसवलत


केंद्र सरकाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये नवीन कर प्रणालीची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी लोकांना दिलासा देताना कर सवलतीची मर्यादा वाढवली आहे. आता 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त झालं आहे.