मुंबई : टीम इंडियामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण काहींना ही संधी लवकर मिळते काहींना मोजकी तर काही वंचितच राहतात. नेक वेळा खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळत नाही.त्यामुळे क्रिकेटपटू इतर देशांमध्ये खेळण्यासाठी जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला विश्वचषक मिळवून देणाऱ्या क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंना इतिहास रचला आहे. कारण बिग बॅशमध्ये खेळणारा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 


2012 रोजी आपल्या नेतृत्वाखाली अंडर 19 मधून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्याची कामगिरी या खेळाडूनं केली. उन्मुक्त चंद असं या या खेळाडूचं नाव आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट लीग बिग बॅशमध्ये खेळताना दिसणार आहे. 


बिग बॅश लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. उन्मुक्त चंद मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून पहिला पदार्पण सामना खेळणार आहे. मेलबर्न रेनेगेड्स संघाचा कर्णधार आरोन फिंच आहे.



BCCI आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही परदेशी टी-20 लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी देत ​नाही. मात्र उन्मुक्तने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. तरीही त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. तिथून अमेरिकेत गेला आमि त्याने तिथल्या मायनर लीग क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. 


आता त्याला बिग बॅस लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याला कॅप देऊन त्याचं संघात टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केलं. त्याच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.