लखनऊ : काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. निष्क्रीय असणाऱ्या मोठ्या नेत्यांचा पत्ता कट करण्याचे आदेश राहुल गांधींनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना दिले आहेत. राहुल गांधींच्या या आदेशामुळे दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या नेत्यांनी आता काँग्रेस हायकमांडची भेट घ्यायला सुरुवात केली आहे.


राहुल गांधींची कडक भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निष्क्रीय बड्या नेत्यांना हटवून अशा कार्यकर्त्यांनाच काम द्या जे खरोखरच संघर्ष करत आहेत, असा आदेश राहुल गांधींनी राज बब्बर आणि काँग्रेस महासचिव तसंच उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांना दिला आहे. तसंच नेत्यांची फौज असलेलली कमिटी बनवण्यापेक्षा आता अध्यक्षासह फक्त ४० जणांचीच कमिटी बनवा. या कमिटीमध्ये नेत्यांपेक्षा कार्यकर्ते जास्त असतील हे पाहायलाही राहुल गांधींनी सांगितलं आहे.


उत्तर प्रदेशमध्ये भाजपची भली मोठी कमिटी


सध्या उत्तर प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्याबरोबर ३६ उपाध्यक्ष, ८४ महासचिव, १४२ सचिव, ५२ संघटन मंत्री, ५७ कार्यकारिणी सदस्य, ५६ अस्थाई आमंत्रित सदस्य, ४२ विशेष आमंत्रित सदस्य आणि १० वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.


नेते उत्तर प्रदेशचे राजकारण दिल्लीचं


उत्तर प्रदेशमध्ये सध्या बरेचसे काँग्रेस नेते हे दिल्लीचं राजकारण करत आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणाकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही. जितीन प्रसाद, आरपीएन सिंग, पीएल पुनिया, संजय सिंग, अनु टंडन, श्रीप्रकाश जयसवाल, प्रमोद तिवारी, आदित्य जैन, राजीव शुक्ला, मीम अफजल, सलमान खुर्शीद, सिराज मेहंदी हे ते नेते आहेत.