जोहान्सबर्ग: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्यामुळे या मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची घोषणा करण्यात आली.


SA टूरच्या नव्या शेड्युलची घोषणा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सोमवारी रात्री टीम इंडियाच्या दौऱ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार आता 'विराट सेना' 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्कवर प्रोटीज संघाविरुद्ध पहिली कसोटी खेळणार आहे.


एका आठवड्याकरता सामने पुढे ढकलले 


दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, CSA आणि BCCI ने 4 डिसेंबर रोजी नवे वेळापत्रक जाहीर केले. हा दौरा होईल परंतु भारतीय संघाचे प्रस्थान एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आणि T20 मालिका या दौऱ्याचा भाग होणार नाही.


26 डिसेंबरच्या पुढे रंगणार सामने


भारतीय क्रिकेट संघ जुन्या वेळापत्रकानुसार 9 डिसेंबरला रवाना होणार होता. पण प्रवासाचा कार्यक्रम बदलला. आता पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होईल, जी आधी १७ डिसेंबरपासून सुरू होणार होती.



4 मैदानात होणार सामने


CSA ने एका निवेदनात म्हटले आहे की, "भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे नवीन वेळापत्रक जाहीर करताना CSA ला आनंद होत आहे. आता या दौऱ्यावर फक्त कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. हा दौरा 26 डिसेंबर ते 23 जानेवारी दरम्यान 4 ठिकाणी होणार आहे. 4 सामन्यांची T20 मालिका पुढील वर्षी योग्य वेळी खेळवली जाईल.


कधी होणार टेस्टचे इतर सामने?


दुसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान जोहान्सबर्गमध्ये आणि तिसरी कसोटी 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान केपटाऊनमध्ये खेळवली जाईल. 3 एकदिवसीय सामने बोलँड पार्क, पारल (19 आणि 21 जानेवारी) आणि केपटाऊन (23 जानेवारी) येथे होणार आहेत.


ICC टूर्नामेंट्सची तयारी 


कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन चक्राचा भाग असेल. त्याच वेळी, एकदिवसीय मालिका आयसीसी विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळली जाईल, जी 2023 विश्वचषक पात्रता स्पर्धा आहे