Team Qualification Eqaution: पॉईंट्स टेबलचं गणित फिस्कटलं; जागा 1 दावेदार 3; सेमीफायनमध्ये कोण मारणार बाजी, पाहा कसं आहे समीकरण?
World Cup 2023, 4th Team Qualification Eqaution: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतासोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या टीम उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यात. सेमीफायनलच्या जागेसाठी अजूनही पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एका टीमला अजून संधी आहे.
World Cup 2023, 4th Team Qualification Eqaution: आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये पुण्याच्या मैदानावर इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात अखेर इंग्लंडने नेदरलँड्सवर विजय मिळवला. अशा परिस्थितीत, इंग्लंड विरुद्ध नेदरलँड सामन्यानंतर आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या 2023 पॉईंट टेबलमध्ये मोठा फेरबदल झाला आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतासोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या टीम उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यात. सेमीफायनलच्या जागेसाठी अजूनही पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एका टीमला अजून संधी आहे.
स्पर्धेत शानदार सुरुवात केल्यानंतर मात्र न्यूझीलंडच्या टीमला उतरती कळा लागल्याचं दिसून आलं. शेवटचे सलग 4 सामने गमावल्यानंतही किवी टीम सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने चांगले कमबॅक करत टॉप-4 च्या शर्यतीत अजूनही आपलं स्थान कायम राखलंय.
सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे अफगाणिस्तानचं समीकरण
अफगाणिस्तानने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यातील 4 सामने जिंकले असल्याने 8 पॉईंट्स आहेत. जर आफगाणिस्तानला सेमीफायनल गाठायची असेल तर तर प्रथम दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. यावेळी केवळ विजय पुरेसा नसून त्याचबरोबर न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या पराभवावरही टीमला अवलंबून राहावे लागणार आहे. जर दोन्ही टीमपैकी एक जरी टीम जिंकली तर चांगल्या नेट रनरेट असणारी टीम पात्र ठरणार आहे.
न्यूझीलंडसमोर श्रीलंकेचं आव्हान
न्यूझीलंडचेही 8 पॉईंट्स असून त्यांना श्रीलंकेविरूद्ध 1 सामना खेळायचा आहे. क्वालिफाय होण्यासाठी न्यूझीलंडला श्रीलंकेचा पराभव करून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या पराभवावर अवलंबून राहावं लागणार आहे. दोन्ही टीमपैकी एकाने एक सामना जिंकल्यास चांगलं रनरेट असलेली टीम पात्र ठरणार आहे. न्यूझीलंडसाठी एक वाईट बातमी म्हणजे बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. जर हा सामना झाला नाही तर संघाला 1 गुण मिळणार आहे.
पाकिस्तानला कशी मिळणार संधी?
सेमीफायनलच्या शर्यतीत पाकिस्तान आघाडीवर आहे. रनरेटमध्येही पाकिस्तान 8 पॉईंट्ससह आघाडीवर आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी टीमला इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. चांगल्या रन रेटने जिंकल्यास ते उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ येणार आहे.