मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी ही गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत उर्वशी रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या. आता उर्वशीनं नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ते दोघं जवळ आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. तिने ऑफ-शोल्डर जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्वशीनं यावेळी सिल्व्हर आणि डायमंड चेन घातली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये ही चेन ऋषभ पंतची असल्याचे म्हटले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्वशीच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'व्वा आता गळ्यात पंतची चेन घातली आहे. दोघांच्या गळ्यातली चेन बघा. दरम्यान, 2018 मध्ये, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या की दोघे मुंबईत वारंवार रेस्टॉरंट्स, पार्टी आणि अनेक फंक्शन्समध्ये एकत्र भेटायचे. त्यावेळी त्यांच्या डेटिंगच्याही अफवा पसरल्या होत्या. गेल्या वर्षी ऋषभ पंतने या अफवांचे खंडन केले आणि ईशा नेगीसोबत असलेल्या त्याचं रिलेशनशिप जाहीर केलं.