Rishabh Pant Urvashi Rautela Controversy: टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi rautela) यांची नावे नेहमीच एकमेकांशी जोडली जातात. आज देखील मीडियांमध्ये या दोघांच्याच अफेअरची चर्चा असते. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करता आली नसल्याने रिषभ अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात लिंक-अप असल्याच्या चर्चा असतानाच आता उर्वशीने मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीला  (Urvashi Rautela) रिषभ विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उर्वशीने स्पष्टीकरणं दिलं.  मला माहिती नाही की ऋषभ पंतला देखील आरपी (RP) म्हणून बोलवले जाते. आरपी हे माझा सहकारी अभिनेता राम पोतीनेनी (ram pothineni) यांचा शॉर्टफॉर्म आहे, असं उर्वशी म्हणाली. मला माहिती नव्हतं, लोकं याचा वेगळा अर्थ काढू शकतील. लोकं अर्धवट ऐकतात आणि आपली मतं मांडतात, असंही उर्वशी म्हणाली आहे.


मला एक गोष्ट खूप खटकते. मला वाटतं की खेळाडू देशासाठी (Team India) खेळतो म्हणून त्यांना खूप प्रेम, सन्मान मिळतो. मात्र अभिनेत्यांनी ही खूप काही केलेलं असतं. ते देखील देशाचं प्रतिनिधित्व करतात. स्वतः मी खूपवेळा असं केलंय. मात्र मला मूर्खासारखी तुलना करणं आवडत नाही, असं उर्वशी म्हणाली आहे.


आणखी वाचा - Gautam Gambhir: "विदेशी कोच भारतात येतात, पैसे कमवतात अन्..."; गंभीरला नेमकं म्हणायचंय काय?


दरम्यान, उर्वशीच्या नावावरून पंतला प्रेक्षकांनी चिवडवल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  झाला होता. त्यावर, ही गोष्ट चिंताजनक आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सन्मान केला गेला पाहिजे. गल्लीतल्या लोकांप्रमाणे त्यांच्याशी देखील वर्तन करू नये. मी देखील हा व्यक्तीगत हल्ला समजते, असंही उर्वशी यावेळी म्हणाली आहे.