Hrithik Shokeen vs Nitish Rana: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समधील (MI vs KKR) हा सामना वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याला अचानक पोटदुखी जाणवू लागल्याने आज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जबाबदारी सांभाळत आहे. तर अर्जुन तेंडूलकरने (Arjun Tendulkar) आज आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे. अशातच आता आजचा सामना आणखी एका कारणामुळे चर्चेत आलाय तो हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) आणि नितीश राणा (Nitish Rana) यांच्यातील भांडणामुळे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन नितीश राणा (Nitish Rana) आणि मुंबई इंडियन्सचा (MI) फिरकीपटू हृतिक शोकीन रविवारी आयपीएलच्या सामन्यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू आमने सामने आल्याने वानखेडे स्टेडियममध्ये तापमान तापलं होतं.


नेमकं काय झालं?


केकेआरचा कर्णधार षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑनवर कॅच आऊट झाला आणि डग आऊटकडे परतत असताना दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस दिली. त्यावेळी नितीश राणा याला संताप अनावर झाला आणि राणा थेट हृतिकला भिडताना दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेमकी चूक कोणाची होती? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.


पाहा Video



दरम्यान, सूर्यकुमार यादव आणि पियुष चावला या दोघांनी तसेच मुंबईच्या खेळाडूंनी दोघांना एकमेकांसमोर उभं राहून दिलं नाही. तसेच नितीशला शांत करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतर नितीश राणा पवेलियनच्या दिशेने तावातावात निघून गेला. या दोन्ही खेळाडूंचा इतिहास देखील वादाचा राहिला आहे. या वादाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झाली होती. रणजीमध्येही फलंदाजी करताना दोघं बोलत देखील नव्हते.