मुंबई : त्यांच्यासाठी वय केवळ आकडा आहे. ६९व्या वयातही त्यांचा उत्साह अनेकांना लाजवेल असाच आहे. आम्ही बोलतोय ६९ वर्षीय सरस्वती राव यांच्याबद्दल. या वयातही त्यांचा उत्साह पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरस्वती राव या माजी प्रसिद्ध टेबिल टेनिसपटू आहेत. काही दिवसांपूर्वी आयोजन केलेल्या स्पर्धेत सरस्वती राव यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत टेबल टेनिस खेळताना त्यांनी आपल्या शॉट्सने अनेकांना आश्चर्यचकित केले. ६९व्या वयातची त्यांचे स्मॅशिंग कमालीचे होते. 


या स्पर्धेतील सरस्वती राव खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि चांगलाच चर्चेत आला. सरस्वती राव यांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही यांच्या एनर्जीचे कौतुक कराल.