लंडन : टी-२० क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर कॉलिन एकरमॅनने टी-२०च्या एका मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. कॉलिन एकरमॅनने टी-२० ब्लास्टच्या मॅचमध्ये बर्मिंघम बियर्सविरुद्ध १८ रन देऊन ७ विकेट घेतल्या. एका टी-२० मॅचमध्ये ७ विकेट घेणारा कॉलिन एकरमॅन जगातला पहिला बॉलर बनला आहे. कॉलिन एकरमॅनच्या या शानदार बॉलिंगमुळे लीस्टरशायर फॉक्सेसने बर्मिंघम बियर्सचा ५५ रननी पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कामगिरीनंतर कॉल एकरमॅन म्हणाला, 'मी हे रेकॉर्ड कधी करेन, असा विचारही केला नव्हता. मी एक बॅटिंग ऑलराऊंडर आहे. मी माझ्या उंचीचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. बॅट्समननी मोठ्या बाऊंड्रीच्या दिशेने शॉट्स मारावे, यासाठी मी प्रयत्न केले.' एकरमॅनने बॉलिंग करताना मायकल बर्गेस, सॅम हेन, विल रोड्स, लियाम बँक्स, एलेक्स थॉमसन, हेन्री ब्रुक्स आणि जीतन पटेल यांना माघारी पाठवलं.



कॉलिन एकरमॅनने मलेशियाचा बॉलर अरुल सुपियाहचा रेकॉर्ड तोडलं. २०११ साली सुपियाहने समरसेटकडून खेळताना ग्लोमोर्गनविरुद्ध खेळताना ५ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या.


लीस्टरशायर फॉक्सेसने पहिले बॅटिंगकरून बर्मिंघम बियर्सला १९० रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना बर्मिंघम बियर्सचा १३४ रनवर ऑल आऊट झाला. बर्मिंघम बियर्सची सुरुवात चांगली झाली होती. टीमने ११८ रन देऊन फक्त ३ विकेट गमावल्या होत्या. पण कॉलिन एकरमॅनने शानदार बॉलिंगमुळे बर्मिंघम बियर्सला पुढे १६ रनच करता आल्या.