मुंबई : विरूष्काच्या मुंबईतील ग्रॅन्ड रिसेप्शनमध्ये सेलिब्रिटींची हजेरी हे प्रमुख आकर्षण होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट आणि सिनेमा विश्वातील सारी दिग्गज मंडळी या सोहळ्याला हजर होते. त्यानंतर रात्रभर हा रंगारंग सोहळा सुरू होता.  


भांगडा डान्स   


विराट कोहली हा पंजाबी गाण्यांचा चाहता आहे. हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्येही पंजाबी गाणी प्रामुख्याने वाजवली गेली. त्यावेळेस विरूष्कासोबत हरभजन सिंग आणि युवराज सिंगदेखील थिरकले.  


 



 


युवराजचे ट्विट  


युवराज सिंगने विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन पार्टीला हजेरी लावल्यानंतर ट्विट करूनही त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस अनुष्काचा उल्लेख 'रोझी भाभी' असा केला आहे. 



 


सेलिब्रिटींची उपस्थिती  


विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला सुमारे ६०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईतील रिसेप्शनला अभिनेता बोमन इराणी, संदीप पाटील सपत्निक पोहचले आहेत. सोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे पोहचले आहेत. भारतीय संघाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीदेखील विरूष्काच्या रिसेप्शन सोहळ्याला सहपरिवार पोहचला आहे.