जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ४८८ रन्सचा विशाल स्कोअर केला. यानंतर बॉलिंगला आलेल्या आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ११० रन्सवर ६ विकेट गेल्या होत्या. वर्नन फिलँडरनं १७ रन्स देऊन ३ विकेट घेतल्या. फिलँडरबरोबरच कागिसो रबाडा, मॉर्ने मॉर्कल, केशव महाराज यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलशी छेडछाडप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे आधीपासूनच ही सीरिज वादात सापडली होती. पण दुसऱ्या दिवशी मॅचमध्ये एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. मैदानात आलेल्या मधमाशीमुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं. या मधमाशीनं ऑस्ट्रेलियाची एक विकेटही वाचवली.


ऑस्ट्रेलियानं ९१ रन्सवर ४ विकेट गमावलेल्या असताना शॉन मार्शला दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज बॉलिंग करत होता. यावेळी विकेट कीपर क्विंटन डीकॉकला मिळालेली स्टम्पिंगची संधी मधमाशीनं हिरावून घेतली. मधमाशी चावल्यामुळे डिकॉकला स्टम्पिंग करता आलं नाही.