नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन ख्रिस लिन याने सिक्सर लगावण्याचा एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लीगमध्ये १०० सिक्सर लगावणारा ख्रिस लिन हा पहिला क्रिकेटर बनला आहे. ब्रिसबेन हीटतर्फे खेळताना ख्रिस लिनने सिडनी थंडरविरोधात सिक्सर लगावला आणि हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. 


लिनने या इनिंगमध्ये ९ बॉल्समध्ये चार फोर आणि एक सिक्सर लगावत २५ रन्स केले. 


क्रिकेटच्या लहान फॉरमॅटमध्ये सिक्सर लगावण्याचा रेकॉर्ड पाहिला तर तो वेस्ट इंडिजचा बॅट्समन ख्रिस गेल याच्याच नावावर आहे. बिग बॅश लीग व्यतिरिक्त इतर सर्वच लीगमध्ये १०० सिक्सर लगावण्याचा रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे.


आयपीएलमध्ये सर्वातआधी १०० सिक्सर गेलने लगावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही सर्वातआधी १०० सिक्सर लगावण्याचा रेकॉर्डही गेलच्याच नावावर आहे. केरिबियन प्रीमियर लीगमध्ये गेलनेच सर्वातआधी १०० सिक्सर लगावले. यासोबतच बांगलादेशमध्ये झालेल्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही गेलने सिक्सरची सेंच्युरी सर्वातआधी केली.



मात्र, बिग बॅश लीगमध्ये १०० सिक्सर लगावण्याचा रेकॉर्ड ख्रिस लिन याने आपल्या नावावर केला आहे.