नवी दिल्ली : क्रिकेट मॅच सुरु असताना मैदानातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील कसारागौड येथे स्थानिक क्रिकेट मॅचमध्ये २० वर्षीय पद्मनाभ या खेळाडूला ह्रदयविकाराचा झटका आला.


मैदानातच कोसळला


बॉलिंग करत असतानाच पद्मनाभ याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो मैदानात कोसळला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंजेश्वारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटना कॅमेऱ्यात कैद


पद्मनाभ करत असलेल्या बॉलिंगचं मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात होतं. त्यामुळे घडलेला संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल


व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, पद्मनाभ बॉलिंग करत होता आणि त्याच दरम्यान तो अंपायरजवळ खाली बसला. मग, पद्मनाभ मैदानातच झोपला. त्यानंतर मैदानात उपस्थित सर्व खेळाडू पद्मानाभजवळ जाताना दिसत आहेत.



यापूर्वीही घडली आहे अशी घटना


मैदानातच खेळाडूचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. २०१५मध्ये बंगालमधील क्रिकेटरची फिल्डिंग करताना एकमेकांना धडक झाली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.