ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे. ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट मॅच जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय क्रिकेट चाहते आनंदी असले तरी ऑस्ट्रेलियातलं स्पोर्ट्स चॅन फॉक्स क्रिकेटनं मात्र रडीचा डाव खेळला आहे. फॉक्स क्रिकेटनं शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३२३ रनचं आव्हान ठेवलं होतं. एकावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ८४/४ असा होता. पण यानंतर शेवटच्या ५ विकेटनी ३१, ४१, ३१, ४१, ३१ रनची आणि शेवटच्या विकेटनं ३२ रनची पार्टनरशीप केली. तळाच्या खेळाडूंनी केलेल्या या पार्टनरशीपमुळे भारताला विजयासाठी झगडावं लागलं.


भारताचा स्पिनर आर.अश्विननं जॉश हेजलवूडला आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाला शेवटचा झटका दिला. केएल राहुलनं जॉस हेजलवूडचा कॅच पकडला. पण राहुलनं पकडलेला हा कॅच वादात सापडला आहे. फॉक्स क्रिकेटनं हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. शेवटचा कॅच नीट पकडला होता का? असा सवाल फॉक्स क्रिकेटनं या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.



राहुलच्या हातात बॉल गेल्यानंतर सटकल्यासारखा या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कॅचवर प्रश्न उपस्थित करणारं ट्विट केल्यानंतर मात्र फॉक्स क्रिकेटवर चाहत्यांनी टीका केली आहे. फॉक्स क्रिकेटचं हे ट्विट निराशाजनक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तर आता ऑस्ट्रेलियाही पाकिस्तान-बांगलादेशसारखं वागायला लागलं का असा टोमणाही क्रिकेट रसिकांनी लगावला आहे.



ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगनं मात्र या कॅचबद्दल माझ्या मनात कोणत्याही शंका नाही. राहुलनं अगदी व्यवस्थित हा कॅच पकडला, असं वक्तव्य रिकी पॉटिंगनं केलं आहे.