नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी याच्यावर न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये जोरदार टीका झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीवीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी धोनीला सल्ला दिला होता की, त्याने टी-२० क्रिकेटमधून सन्यास घ्यावा. या सीरिजनंतर धोनीच्या फिटनेसबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण धर्मशाला इथे झालेल्या वनडे सामन्यात धोनीने पुन्हा एकदा आपल्या दमदार प्रदर्शनाने टीकाकारांची तोंडं बंद केली. 


आता धोनीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणा-यांसाठी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत दुस-या वनडे सामन्याआधी पहिल्या प्रॅक्टीस सामन्या सेशन दरम्यान धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्यात १०० मीटरची रेस लावण्यात आली. आता या दोन्ही दिग्गजांच्या रेसमध्ये कोण जिंकलं हे आश्चर्यकारक आहे. 



धोनी आणि पांड्याच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. पण या रेसमध्ये धोनीने पांड्याला पराभूत केलंय. या रेसमध्ये सुरूवातीपासून पांड्या धोनीच्या मागेच राहिला. ही रेस जिंकून पुन्हा एकदा धोनीने तो फिटनेसच्या बाबतीत तरूण खेळाडूंपेक्षा जराही मागे नसल्याचे दाखवले आहे. बीसीसीआयच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात कमेंट येऊ लागले आहेत.