मुंबई : कॅप्टन रोहित शर्माने नाबाद दुहेरी शतक करत बुधवारी आय एस बिंद्रा स्टेडिअममध्ये खेळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकाने भारताने ठेवलेल्या ३९३ धावांच्या टार्गेटसमोर अक्षरशः गुडघे टेकले. आणि फक्त १४१ रन्सने सामना गमावला. हा सामना जिंकून भारताने तीन वनडे मॅचच्या सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे. मोहालीतील हा वन डे सामना हा रोहित शर्माच्या नावावर आहे. मात्र धोनी पण या सामन्यात उजवा ठरला. त्याच्याबद्दल चर्चा करणाऱ्या लोकांना त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे. 


मोहाली वनडे मॅचमध्ये हार्दिक पांड्याला १०० मीटरच्या रेसमध्ये हरवून आणि मग मैदानमध्ये दोन कॅच, एक स्टंप करून त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की टीम इंडियाला धोनीची किती गरज आहे. न्यूझीलँड टी - २० च्या सामन्यानंतर धोनीच्या फिटनेसला घेऊन अनेक प्रश्न उभे करण्यात आले. मात्र त्याच्यावर झालेल्या सर्व टिकाकारांना त्याने गप्प बसण्यास भाग पाडले आहे. 


पाहा हा व्हिडिओ 



मॅचच्या दरम्यान धोनीने एक अशी कॅच घेतली.  स्टेडिअम  बसलेल्यां प्रेक्षकांचा श्वास एक क्षण थांबला होता. श्रीलंकेच्या या सामन्यातील ३१ व्या ओव्हरमध्ये युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर श्रीलंकाचे कॅप्टन थिसारा परेराने स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तो बॉल चांगला खेळता आला नाही. तर त्या बॉलमागे धावत महेंद्र सिंह धोनीने अगदी उंच उडी मारत जबरदस्तपणे तो बॉल एका फटक्यात पकडला. 


या कॅचला पकडण्याच्या दरम्यान एम एस धोनीने विकेटच्या पाठी उभं राहून ही कॅच पकडलली. त्यानंतर त्याला डाव्या हाताला दुखापत झाली. हात चोळत धोनी पुढे आला. त्याच्या हाताला जास्त दुखापत नसल्याचं समजत आहे.