मुंबई : क्रिकेटप्रेमींना अंपायर बिली बाउडन हे नाव काही नवीन नाही. बिली बाउडन हे त्यांच्या असामनय अंपायरिंगसाठी ओळखले जातात. प्रेक्षकांचं मनोरंजन करत ते अंपायरिंग करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंपायर म्हटलं की, त्यांचं काम खूपच गंभीरतेने पाहिलं जातं. पण आता अशा एका अंपायरचा मैदानातील डान्स व्हिडिओ समोर आलाय. सध्या हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे.


हा व्हिडिओ पाहून त्यातील अंपायर बिली बाउडन यांच्याही पुढे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. टीम इंडियाचा स्पिनर रविंद्र जडेजाने  या अंपायरचा व्हिडिओ शेअर केलाय. क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंना तुम्ही नेहमीच जल्लोष करताना पाहिलं असेल. पण अंपायरना तसं पाहण्याचा योग आला नसेल. पण या व्हिडिओतील अंपायर बॉलिवूड गाण्यांवर धमाकेदार डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.  



रविंद्र जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. अंपायरचा हा डान्स पाहून खेळाडू आणि प्रेक्षकही आनंद घेत आहेत. हा डान्स करणारा अंपायर इलीट पॅनलचा अंपायर असल्याचं सांगण्यात येत आहे. बघा हा धमाकेदार व्हिडिओ आणि आनंद घ्या.