प्रसिद्ध क्रिकेट प्रँकस्टर 'जार्वो 69' याने आपण मैदानात घुसखोरी केल्यानंतर शूट केलेला व्हिडीओ नुकताच अपलोड केला आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईतील चिदंबरम स्टेडिअममध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरु असताना जार्वो मैदानात भारतीय संघाची जर्सी घालून घुसला होता. यावेळी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होतं. दरम्यान जार्वो मैदानात आल्यानंतर सिराज, के एल राहुल आणि विराट कोहली यांनी त्याला रोखत संताप व्यक्त केला होता. जार्वोने शूट केलेल्या व्हिडीओत के एल राहुल त्याला शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात भारत-ऑस्ट्रेलिया जार्वोने भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात प्रवेश केला होता. यावेळी मोहम्मद सिराजने त्याला थांबण्यास सांगितलं होतं. पण तो न ऐकता पुढे चालत गेला होता. यानंतर संतापलेला के एल राहुल जार्वोच्या दिशेने धावत आला होता. यावेळी संतापात त्याने शिवीगाळ करत, प्रत्येक ठिकाणी येणं बंद कर असं म्हटलं होतं. तसंच मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं होतं. 


जार्वोनेही बॉडी कॅमने हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ आता त्याने शेअर केला आहे. 



जार्वोवर ICC कडून बंदी


जार्वो हा इंग्लंडमधील एक प्रसिद्ध स्ट्रीकर आहे जो 2021 मध्ये इंग्लंड-भारत कसोटी मालिकेदरम्यान अनेक वेळा खेळपट्टीवर आक्रमण करून प्रसिद्धीस आला होता. वर्ल्डकपमधील भारताच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान त्याने पुन्हा एकदा घुसखोरी केली होती. मात्र, त्याला त्वरीत पकडण्यात आलं होतं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर नेलं होतं. स्टार इंडियाचा फलंदाज विराट कोहलीही जार्वोसोबत संवाद साधत त्याला खडे बोल सुनावल्याचं दिसलं होतं.



मैदानात वारंवार घुसखोरी करत असल्याने आयसीसीने त्याच्यावर बंदी घातली आहे. जार्वोने फक्त क्रिकेट नाही तर इतर खेळाच्या सामन्यातही घुसखोरी केल्या आहेत.