Babar Azam : नुकतेच आयसीसीने टी20  रँकिग (Icc T20I Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पाकिस्तानच्या बाबर आझमचं (Babar Azam) स्थान कायम आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम पाकिस्तानी पत्रकारावर संतापलेला पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझम नेदरलँड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलत होता. या पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने बाबर आझमला कामाच्या ओझ्याबाबत विचारले असता, त्यांच्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली. बाबरने पत्रकाराला प्रत्युत्तर देत मी म्हातारा झालोय असे तुम्हाला वाटते का असा सवाल केला.


नुकत्याच श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बाबरच्या पराभवावरून त्याच्यावर निशाणा साधला. .


पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम नेदरलँड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलत असताना एका पत्रकाराने त्याला खेळाच्या व्यपस्थापनाबाबत प्रश्न विचारला होता. 


या प्रश्नाला उत्तर देताना बाबर म्हणाला की, "हे आमच्या फिटनेसवर अवलंबून आहे. जसा आमचा फिटनेस आहे, तसा आम्ही कधीच विचार केला नाही. तुम्हाला वाटते की मी म्हातारा झालो किंवा आम्ही म्हातारे झालो आहोत? जर भार वाढत असेल तर त्यासाठी अतिरिक्त तंदुरुस्त राहावे लागेल आणि आम्ही त्यावर काम करत आहोत."



पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बाबर सध्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर कसोटीच्या फलंदाजी क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. 


आशिया कप 2022 च्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. आशिया चषकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा फॉर्म असाच सुरू राहिला तर भारतीय संघासमोर मोठी अडचण निर्माण होईल.