न्यूझीलंड : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला जातोय. किवी फलंदाज रॉस टेलरसाठी हा सामना खूप खास आहे. कारण न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कसोटी फलंदाज टेलर व्हाईट जर्सीमध्ये न्यूझीलंडकडून शेवटचा सामना खेळताना दिसला. दरम्यान शेवटच्या सामन्यावेळी रॉस टेलर भावूक झाल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉस टेलरचा हा शेवटचा सामना असून या सामन्यात तो भावूक झालाय. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल कऱण्यात आला आहे.


शेवटच्या सामन्यात मैदानावर उतरलण्यावर टेलरने खास रेकॉर्डही केलाय. टेलर हा न्यूझीलंडसाठी सर्वाधिक खेळणारा कसोटी क्रिकेटपटू बनलाय. त्याने माजी फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरीशी बरोबरी केली. 


न्यूझीलंडकडून टेलरचा हा 112वा आणि शेवटचा कसोटी सामना होता. डॅनियल व्हिटोरीनेही न्यूझीलंडसाठी इतकेच कसोटी सामने खेळले आहे. यानंतर या यादीमध्ये माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग 111 आणि ब्रॅडन मॅक्युलम 101 यांचा समावेश आहे.



गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी, टेलरने ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे बांगलादेशविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका ही त्याची शेवटची कसोटी असणार आहे.


फेअरवेल टेस्ट मॅचपूर्वी झालेल्या मुलाखतीत टेलर म्हणाला, "माझी पहिली टेस्ट मॅच जोहान्सबर्गमध्ये झाली होती. त्यानंतर फ्लेमिंगने निवृत्ती घेतली. काही खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीममध्ये बरेच बदल झालेत. टीमचा प्रवास छान झाला आहे. शिवाय काही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि ते खूप अनुभवी आहेत. पुढील काही वर्ष टीम चांगल्या स्थितीत असेल."