लंडन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये पाकिस्तानचा पराभवाचा धक्का लागला. याचबरोबर पाकिस्तानने सीरिजही गमावली आहे. तिन्ही मॅचमध्ये पाकिस्तानने ३५० रनपेक्षा जास्त स्कोअर केला. पण तरीही पाकिस्तानला एकही मॅच जिंकता आली नाही. चौथ्या मॅचमध्ये शोएब मलिक विचित्र पद्धतीने हिट विकेट आऊट झाला. यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या वनडेमध्ये पहिले बॅटिंग करताना पाकिस्तानने ३४० रन केले. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शोएब मलिकने ४१ रनची खेळी केली. ३४० रनचं लक्ष्य वाचवणं पाकिस्तानच्या बॉलरना जमलं नाही. जेसन रॉयने ८९ बॉलमध्ये ११४ रन केले. यानंतर बेन स्टोक्सने इंग्लंडला विजय मिळवून दिला.


पाकिस्तानच्या बॅटिंगची ४७वी ओव्हर सुरु असताना स्कोअर ३१६ रन होता. शोएब मलिक आणि पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खान मैदानात होते. शोएब मलिकने तेव्हा २५ बॉलमध्ये ४१ रन केले होते. मलिक बॅटिंग करत असल्यामुळे स्कोअर ३५०च्या वर जाईल, असं वाटत होतं. पण मोक्याच्या क्षणी मार्क वूडच्या तिसऱ्या बॉलवर शोएब मलिक हिट विकेट आऊट झाला.



१६ वर्षानंतर शोएब मलिक अशा पद्धतीने हिट विकेट झाला. याआधी १८ मे २००३ साली शोएब मलिक श्रीलंकेविरुद्ध मुथय्या मुरलीधरनच्या बॉलिंगवर हिट विकेट झाला होता.