नवी दिल्ली : निडास ट्रॉफीत श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या सुरेश रैनाने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून टीम इंडियाने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गुणातिलका आणि मेंडिस यांनी १५ रन्स केले. त्यामुळे श्रीलंका पुन्हा एकदा धमाका करणार असं दिसत होतं. 


गुणातिलकाने ८ बॉल्समधअये १७ रन्स केले त्यानंतर गुणातिलकाने पुन्हा एक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तेथे तो फसला. कारण, हवेत उडालेला बॉल सुरेश रैनाने उडी मारत पकडला आणि गुणातिलका आऊट झाला. 



मोठ्या काळानंतर टीम इंडियात पुनरागमन केलेल्या सुरेश रैनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, तो टीम इंडियाचा बेस्ट फिल्डर आहे. 


गेल्या मॅचमध्येही गुणातिलकाने १२ बॉल्समध्ये १९ रन्स केले होते. आतापर्यंत सीरिजमध्ये रैनाने २ मॅचेसमध्ये २९ रन्स बनवले आहेत. टीम इंडियाकडून सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवन अव्वल आहे. त्याने २ मॅचेसमध्ये १४५ रन्स बनवले आहेत.



या मॅचपूर्वी श्रीलंकेत सुरेश रैना हा बॉलिवूडचं गाणं गाताना दिसला होता. बीसीसीआयने स्वत: याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.