नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा विचित्र घटना घडलेल्या पाहिल्यात. कधी प्रेक्षकांमध्ये तर कधी मैदानावर अशा काही घटना घडत असतात. पाकिस्तानातील एका सामन्यातही अशीच काहीशी विचित्र घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यावेळी स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी वा खेळाडूंनी काही केले नाही तर हा प्रकार नव्या न बोलवलेल्या पाहुण्यांमुळे घडला.


रावळपिंडीच्या मैदानात लाहोर व्हाईट्स आणि पेशावर नॅशनल यांच्यात सामना सुरु असताना ही घटना घडली. या दोन्ही संघांमध्ये टी-२० सामना सुरु होता. 


पेशावर नॅशनलचा संघ फलंदाजी करत होता. १४वे षटक सुरु असताना त्यांच्या दोन विकेट पडल्या होत्या. सामन्यात १६२ धावसंख्या झाली होती. यावेळी पेशावर नॅशनलचे आमिर आणि सलमान फलंदाजी करत होते. लाहोरकडून सोहेल गोलंदाजी करत होता. सोहेलच्या चौथ्या चेंडूवर आमिरने षटकार खेचला. 


तो षटकातील पाचवा चेंडू टाकणार इतक्या अंपायर मैदानात अचानक झोपले. त्यावेळी अंपायर अचानक का झोपले हे कोणालाच कळेना. मात्र थोड्यावेळानंतर एकापाठोपाठ एक सगळेच खेळाडू मैदानावर झोपले. संपूर्ण मैदान मधमाशांनी भरुन गेले होते. यामुळेच मधमाश्यांपासून बचावासाठी सगळे खेळाडू मैदानावर आडवे झाले. 



 


दोन मिनिटांसाठी सामना थांबवण्यात आला. त्यानंतर मधमाश्यांची फौज निघून गेल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला.