केपटाउन : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान ५ जानेवारी पासून सामन्याला सुरूवात होणार आहेत. त्याआधी आफ्रिकेसोबत कोणतीही प्रॅक्टीस मॅच खेळणार नसल्याचे टीम इंडियाने आधीच जाहीर केले होते. 


इंडोअर प्रॅक्टीस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराव करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली पण पावसाने गोंधळ घातला. त्यामूळे  टीमला इंडोअर प्रॅक्टीस करावी लागली.


यावेळी रोहित शर्माने आपल्या खास अंदाजात सुरू असलेल्या प्रॅक्टीस सेशनची कॉमेंट्री केली. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


व्हिडिओ व्हायरल 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप शेअर होत आहे. यामध्ये सलामी फलंदाज अजिंक्य रहाणे, विराट कोहली हे प्रॅक्टीस करताना दिसत आहेत.


तसेच फास्ट बॉलर आवेश खान आणि अंकित राजपूत बॅट्समन्सना बॉलिंग करत आहेत. 


फास्ट बॉलर्सना मदत



या खेळात टीम इंडियाच्या बॉलर्सवर सर्वांची नजर असणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेतील मैदानात फास्ट बॉलर्सना मदत मिळते.


त्यामूळे टीम इंडियाच्या वेगाचा मारा कसा प्रभाव टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.