नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये सध्या अंतर्गत टुर्नामेंट बिग बॅश लीग टी-२० सुरू आहे. या टुर्नामेंटमध्ये नेहमीच चांगले परफॉर्मन्स बघायला मिळतात. असाच एक अविश्वसनीय कॅच या खेळादरम्यान बघायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रावो मेलबर्न रेनेगेड्सकडून ४ रन्सवर खेळत होता. ब्रावोने जोरदार शॉट लगावला आणि बॉल हवेत गेला. असे वाटत होते की, बॉल सिक्सरसाठी मैदानाबाहेर जाणार. अशात बॉल पकडण्यासाठी बेन लाफकिन धावत होता. जॅक वेदरलॅंडने केवळ सिक्सर वाचवला असे वाटत असतानाच त्याने सर्वांनाच धक्का दिला. त्याने बॉल कॅच केला. आणि शानदार कॅचमुळे रेनेगेड्सचा आशा संपुष्टात आल्या. 




रेनेगेड्सला विजयासाठी १७४ रन्स करायचे होते. पण त्याची टीम १४७ रन्सवर ७ विकेट गमावून बसली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेकांच्या नजरा होत्या. वेदरलॅंडने कॅच घेतल्यावर सांगितले की, मला स्वत:ला यावर विश्वास बसत नाहीये. मी डाईव्ह करून बॉल पकडण्याचा प्रयत्न केला आणि बॉल माझ्या हाताला चिकटला. 


या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, बॉल हवेत होता आणि लॉंग ऑफ बाऊंड्रीबाहेर जाताना दिसत होता. पण तेव्हाच बेन लाफकिन धावत आला आणि त्याने कॅच घेतली.