मुंबई : पाकिस्तानच्या बॉलरसाठी विरेंद्र सेहवाग हा कायमच खराब स्वप्नासारखा आहे. कारण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानविरूद्ध पहिल्यांदा भारताकडून तिहेरी शतक लावणारा सेहवाग. 2003 च्या विश्वकप सामन्यात तुफानी खेळणारा विरू हा कायमच पाकिस्तानवर हावी पडलेला आहे. जरी विरेंद्र सेहवागने सन्यास घेतला असला तरीही लवकरच शाहिद आफरिदी आणि शोएब अख्तरसोबत पुन्हा एकदा तो क्रिकेटच्या मैदानात भिडणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा हा सामना आइस क्रिकेटच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. 


पाकिस्तानचे माजी कॅप्टन शाहिद आफरिदी आणि दक्षिण आफ्रिकाचा माजी कॅप्टन ग्रीम स्मिथ 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी स्विझरलँडमध्ये खेळण्यात येणाऱ्या सेंट मॅरिट्ज आइस क्रिकेटमध्ये खेळणार आहे. या टूर्नामेंटमध्ये रिटायर झालेले सर्व खेळाडूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आफ्रिदी बरोबरच आता स्मीथ देखील फेब्रुवारीत या मास्टर्स चॅम्पिअन लीगमध्ये दिसणार आहे. 



या टूर्नामेंटमध्ये विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, शोएब अख्तर, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, माइकल हसी, जॅक कॅलिस, डेनिअलविटोरी, नेथन मॅकुलम, ग्रांट इलियट, मोंटी पनेसर आणि ओवैस शाह सारखे क्रिकेटर आपल्याला येथे पाहायला मिळणार आहेत. या सामन्याबाबत स्मिथ म्हणतो की, मला माहीत नाही या मॅचबद्दल मी काय बोलू? पण जगातील सर्वात सुंदर ठिकाणी क्रिकेट खेळायला मिळणार आहे त्यामुळे मी खूप खूष आहे. मला विश्वास आहे हा प्रयत्न सफल होईल