VIDEO: जेव्हा अंडरविअरमध्ये टिश्यू पेपर लावून बॅटींगसाठी उतरतो सचिन तेंडुलकर
‘प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात सचिनने अशा काही क्षणांचा उल्लेख केला आहे ज्यावरुन हे कळून येतं की, महान होणं इतकही सोपं नाही.
नवी दिल्ली : क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा ‘क्रिकेटचा देव’ बनण्यापर्यंतचा प्रवास बराच लांबचा आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात सचिनने अशा काही क्षणांचा उल्लेख केला आहे ज्यावरुन हे कळून येतं की, महान होणं इतकही सोपं नाही.
याच पुस्तकात त्याने अनेक गंमतीदार किस्सेही सांगितले आहेत. एकदा सचिनला अंडरविअरमध्ये टिश्यू लावून मैदानात यावं लागलं होतं. तो किस्साही यात वाचायला मिळतो.
अंडरविअरमध्ये टिश्यू...
सचिनने पुस्तकात उल्लेख केलाय की, हा क्षण खूपच लाजिरवणा होता. पण मला देशासाठी खेळायचे होते. २००३ मध्ये आयसीसी वर्ल्ड कपच्या सुपर ६ सामन्यात टीम इंडिया श्रीलंके विरूद्ध खेळत होती. तेंडुलकर फलंदाजी करत होता आणि पोट बिघडल्याने त्याला अंडरविअरमध्ये टिश्यू लावून यावं लागलं होतं.
सचिनला विचित्र वाटत होतं, पण...
सचिन तेंडुलकरने जोहान्सबर्गमध्ये झालेल्या या सामन्यात ९७ रन्स केले होते. त्याने लिहिले की, ‘मी ही बाब सांगण्यात मला खूप विचित्र वाटत होतं. मला सांगताही येत नव्हतं. ही बाब एक खूपच खाजगी बाब होती’.
काय झालं होतं नेमकं?
सचिनने सांगितले होते की, माझं पोट बिघडलंय. मला डिहायाड्रेशनची समस्या होत होती. माझ्या पोटात मुरडा येत होता. मी एनर्जी ड्रिंकमध्ये एक चमचा मिठ टाकलं होतं. मला वाटलं याने मला बरं वाटेल. पण त्यानेच माझं पोट अधिक बिघडलं. अशात स्थिती इतकी वाईट होती की, अंडरविअरमध्ये टिश्यू असूनही मला फलंदाजी करावी लागली होती. ड्रिंक्स दरम्यान मी ड्रेसिंग रूममध्येही गेलो होतो. मात्र पिचवर मला खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं’.
किती केले होते रन्स?
श्रीलंके विरूद्धच्या या सामन्यात सचिनने अशा स्थितीतही १२० बॉल्सचा सामना करत ९७ रन्स केले होते. हा सामना टीम इंडियाने १८३ रन्सने जिंकला होता.