नवी दिल्ली :  टीम इंडियाला गेल्या काही दिवसांपासून यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या क्रिकेटच्या मैदाना ऐवजी गोल्फच्या मैदानावर आपला जलवा दाखवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सिरीज खेळत आहे. चहल हा टेस्ट टीमचा हिस्सा नाही. पण अशात सुट्टी एन्जॉय करत तो गोल्फ खेळत आहे. त्याला वन डे संघात स्थान देण्यात आले आहे. जेव्हा वन डे सिरीज सुरू होईल तेव्हा चहल टीम इंडियात सामील होणार आहे. 


सध्या तो गोल्फच्या मैदानावर आपला वेळ घालवत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ चहलने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. यात तो धोनीच्या हेलिकॉप्टर स्टाइलमध्ये गोल्फ स्टिकने शॉट मारताना दिसत आहे. तसेच त्याने या शॉटची तुलना धोनीच्या शॉटशी केली आहे. 


यानंतर कमेंट बॉक्समध्ये फॅन्सने मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. यात खास कमेंट टीम इंडियाचा वन डे उपकर्णधार रोहित शर्मा याची आहे. रोहितने लिहिले की, या शॉट सह स्वतः उडून नको जाऊन... यावर उत्तर देताना चहलने लिहिली की... हा हा.. स्टिक नसती तर मी उडालो असतो, ये गोल्फ क्लब है भय्या... 


एक फेब्रुवारीपासून साऊथ आफ्रिकेविरूद्ध सहा वन डे सामन्यांची सिरीज सुरू होणार आहे. यासाठी युजवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेला काही दिवसात जाणार आहे. या संघात चहल शिवाय कुलदीप यादवचाही समावेश करण्यात आला आहे. 



रोहित शर्माशिवाय युजवेंद्र चहलचे क्रिकेट फॅन्सही त्याच्या या व्हिडिओवर कमेंट कर आहेत. त्यातील एकाने म्हटले की तुम्ही गोल्फ खेळताहेत की क्रिकेट...