राजकोट : मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) युवा ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) चंडीगढ (Chandigarh) विरुद्ध विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) खणखणीत शतक ठोकलंय. वेंकटशने अवघ्या 113 चेंडूत 151 धावांची शानदार खेळी केली. वेंकटेशचं या स्पर्धेतील हे दुसरं शतक ठरलं. वेंकटशने या खेळीत 10 गगनचुंबी सिक्स आणि 8 रंपाट फोर लगावले. वेंकटेशच्या या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 331 धावा केल्या. (Vijay Hazare Trophy 2021 22 Madhya Pradesh all rounder Venkatesh Iyer scored hundred against Chandigarh at Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेंकटेश आपल्या टीमसाठी चौथा सामना खेळतोय. वेंकटेशची या स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक राहिली. वेंकटेशला महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात 14 धावाच करता आल्या. या सामन्यात मध्य प्रदेशचा 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.   


मात्र यानंतर वेंकटेशने जोरदार मुसंडी मारली. केरळ विरुद्धच्या सामन्यात वेंकटेशची बॅट चांगलीच तळपली. वेंकटेशने केरळ विरुद्ध 112 धावांची खेळी केली.


या सामन्यात मध्य प्रदेशने केरळवर 40 धावांनी मात केली. मध्य प्रदेशच्या या विजयात वेंकटेशची निर्णायक भूमिका राहिली. 


तर यानंतर वेंकटेश तिसरा सामना हा उत्तराखंड विरुद्ध खेळला. या सामन्यात 71 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीमुळे मध्य प्रदेशने उत्तराखंडवर 77 धावांनी विजय मिळवला.  


दरम्यान मध्य प्रदेशचा चंडीगढ विरुद्ध सुरु असलेला सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मध्य प्रदेश  या स्पर्धेतील डी गटात अव्वल स्थानी आहे.   


चंडीगडला विजयासाठी 332 धावांचे आव्हान


दरम्यान मध्य प्रदेशने चंडीगडला विजयासाठी 332 धावांचे आव्हान दिले आहे. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना चंडीगडची सावध सुरुवात राहिली. मात्र त्यानतंर ठराविक अंतराने 3 विकेट्स गमावल्या. चंडीगडने 13.2 ओव्हरमध्ये 77 धावांवर 3 विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे आता हा सामना मध्य प्रदेश जिंकणार की चंडीगड कमबॅक करणार, याकडे लक्ष असणार आहे.