मुंबई: विजय हजारे स्पर्धेमध्ये सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध पृथ्वी शॉ पुन्हा एकदा आपली दमदार फलंदाजी करताना दिसला. आपल्या झंझावती फलंदाजीनं कर्नाटकच्या गोलंदाजांना गार केलं. तर कर्नाटक संघाचे धाबे मुंबईच्या पृथ्वी शॉनं दणाणून टाकले. त्याच्या या तुफान खेळीनं मैदानात काही वेळासाठी दहशत पसरली. पृथ्वीच्या शतकी खेळीमुळे क्रिकेटविश्वातच नाही तर संपूर्ण सोशल मीडियावरही त्याचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉचं या हंगामातील 5 सामन्यांमधलं तिसरं शतक तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चौथं शतक आहे. त्याने 79 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांची खेळी केली. 


विजय हजारे ट्रॉफीच्या दुसर्‍या सेमी फायनलमध्ये  मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉने आपल्या तुफान फटकेबाजीनं कर्नाटकच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. 12 चौकार आणि 3 षटकारांची खेळी केली. पृथ्वीच्या जोडीला असलेला यशस्वी जयस्वाल मात्र ज्यादा धावा करण्यात अपयशी ठरला आहे. 


World Test Championship Ind vs Nz: अंतिम सामन्याचं ठिकाण बदललं


पृथ्वीनं 48 चेंडूमध्ये 7 चौकारर आणि 1 षटकार मारून पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं 79 चेंडूमध्ये आपली शतकी खेळी केली आहे. त्याने याआधी दिल्ली विरुद्ध 89 चेंडूत 105 धावा करून नाबाद खेळी केली होती. तर पदुचेरी विरुद्ध 125 चेंडूमध्ये 227 धावा केल्या होत्या. क्वार्टर फायनलमध्ये पृथ्वीनं 123 चेंडूत सौराष्ट्र विरुद्ध 185 धावा केल्या होत्या. 


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉला विशेष चांगली कामगिरी करण्यात यश मिळालं नाही. त्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आलं. तर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात देखील त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्याने आपल्या सारावावर लक्ष केंद्रीत ठेवलं. पुन्हा एकदा विजय हजारे ट्रॉफीतून त्यानं आपली दमदार कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वीनं मुंबई संघाची कमान सांभाळत आपली शतकी खेळी केली आहे.