मुंबई: पृथ्वी शॉनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एकामागे एक शतकं ठोकली आणि अनेक विक्रम केले. त्याचे हे विक्रम पाहून सर्वजण थक्क झाले. चाहत्यांकडून पृथ्वीवर कौतुकाचा वर्षावर सुरू आहे. आपल्या धमाकेदार आणि झंझावाती फलंदाजीच्या मागे कोणाचं श्रेय आहे हे सांगताना काहीसा भावुक झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉला काहीसं अपयश आलं होतं. त्या अपयशावर मात करण्यासाठी त्याला मदत केली ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पृथ्वीनं सचिनची भेट घेतली आणि त्याने आपलं मन मोकळं केलं. त्यानंतर सचिननं त्याला एक टीप दिली. त्यामुळे पृथ्वीला नवी प्रेरणा आणि उर्जा मिळाली. पुन्हा नव्या जोमानं तो विजय हजारे स्पर्धेत उतरला. या स्पर्धेत पृथ्वीनं अक्षरश: आपल्या फलंदाजीनं मैदान हादरवून सोडलं. तर टीका करणाऱ्यांची तोंड बंद झाली असून आश्चर्यानं भुवया उंचावल्या.


 पृथ्वी शॉने एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार 'जेव्हा मी सचिन सरांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की जास्त बदल करु नकोस. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या शरीराच्या जवळ बॉलला खेळवत राहा. मी त्या बॉलपर्यंत उशिरा पोहोचत होतो. त्यामुळे मला सातत्यानं अपयश मिळत होतं. सचिन सरांनी दिलेल्या कानमंत्रावर मी दिवसरात्र मेहेनत केली. याचं कारणही माझ्या लक्षात आलं, कदाचित IPL खेऴून थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यामुळे असं झालं असावं.


पृथ्वी शॉनं विजय हजारे स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यानं सीरिजमध्ये चार शतकं ठोकली. त्याच्या या यशाच्या वाट्यात रवी शास्त्री आणि विक्रम राठौड यांचं श्रेय देखील आहे. 


पृथ्वी शॉनं कर्नाटकला हादरवून सोडत आपलं शतक पूर्ण केलं त्यानं या हंगामातील 5 सामन्यांमधलं तिसरं शतक तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चौथं शतक आहे. त्याने 79 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांची खेळी केली.  पृथ्वीनं 48 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार मारून पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं 79 चेंडूमध्ये आपली शतकी खेळी केली आहे. त्याने याआधी दिल्ली विरुद्ध 89 चेंडूत 105 धावा करून नाबाद खेळी केली होती. तर पदुचेरी विरुद्ध 125 चेंडूमध्ये 227 धावा केल्या होत्या. क्वार्टर फायनलमध्ये पृथ्वीनं 123 चेंडूत सौराष्ट्र विरुद्ध 185 धावा केल्या होत्या.