लंडन : बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार किंगफिशरचा मालक विजय माल्या लंडनमध्ये भारत आणि श्रीलंका मॅच पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियमवर पोहोचला होता. याआधी विराट कोहलीच्या चॅरिटी इवेंटमध्ये देखील माल्या पोहोचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माल्याने म्हटलवं होतं की, तो भारताच्या सर्व मॅच पाहण्यासाठी मैदानावर जाईल. बर्मिंगममध्ये माल्याचा सुनील गावस्कर यांच्यासोबत एक फोटो देखील व्हायरल झाला होता. बर्मिंगममध्ये माल्या गावस्करांना भेटला असं म्हटलं जात होतं. पण याबाबत गावस्कर आणि माल्या यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही.


माल्या हा कोहलीच्या कार्यक्रमात पोहोचला तेव्हा देखील चर्चा रंगल्या होत्या पण कोहलीच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं की माल्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. विवादात असलेल्या माल्याला पाहून कोणताच खेळाडू त्याच्या जवळ गेले नाहीत. त्याच्यापासून सगळ्यांनी अंतर ठेवणच पंसद केलं.