BCCI Selection Committee ​: टी20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या (Team India) अपयशानंतर बीसीसीआयने (BCCI) चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली असलेली निवड समिती बरखास्त केली होती. या निर्णयानंतर आता नव्याने निवड समितीचे (BCCI Selection Committee) अर्ज मागवले जात आहेत. या नव्या निवड समितीत अनेक नावांची चर्चा आहे. त्यात आता आणखीण एक नाव चर्चेत आले आहे. हे नाव क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या जवळचे आहे. त्यामुळे हा सिलेक्टर कोण आहे,याची चर्चा रंगली आहे.  


हे ही वाचा : सुर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी,'हा' मोठा रेकॉर्ड खुणावतोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने (BCCI) चेतन शर्माच्या नेतृत्वाखाली असलेली निवड समिती (BCCI Selection Committee) बरखास्त केल्यानंतर अनेक माजी खेळाडूंची निवड समितीच्या शर्यतीत चर्चा आहे. या शर्यतीत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने उडी घेतली आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा आहे. मुंबईच्या सिनिअर टीमच्या निवड समितीतीस सध्याचे प्रमुख सलिल अंकोला, माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांनी देखील निवड समितीच्या पदांसाठी अर्ज केले आहेत. 


अजित आगरकरच्या नावाची चर्चा


निवड समितीच्या शर्यतीत (BCCI Selection Committee)  भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकरने अर्ज केल्यास तो मुख्य निवडकर्ता होण्याची खात्री आहे. 


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, माजी फिरकीपटू मनिंदर सिंग, माजी सलामीवीर शिव सुंदर दास यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या वरिष्ठ निवडकर्त्यांच्या पदांसाठी अर्ज केले आहेत.


निवड समिती प्रमुखपदासाठीची पात्रता ? 


  • या पदासाठीच्या उमेदवाराला किमान 7 किंवा अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असावा. 

  • उमेदवाराला 30 प्रथम श्रेणी सामने, 10 एकदिवसीय सामने किंवा 20 लिस्ट-ए सामन्यांचा अनुभव असावा. 

  • मुख्य निवडकर्ता पदासाठीच्या उमेदवाराने क्रिकेटमधून निवृत्तीची 5 वर्षे पूर्ण केलेली असावीत.


दरम्यान बीसीसीआयच्या नवीन निवड समितीमधील (BCCI Selection Committee) सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 नोव्हेंबर रोजी संपली आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवे निवडकर्ते मिळणार आहेत.