Viral Video : सोशल मीडियावर अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत. फुटबॉलच्या एका लाईव्ह सामन्यात अंगावर वीज कोसळून (Lightning Strike) खेळाडूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंडोनेशियातल्या (Indonesia) बान्डुंगमध्ये फुटबॉलचा हा सामना सुरु होता. इथलं वातावरण पावसाळी होतं. दोन संघ एकमेकांना भिडले होते, आणि चुरशीचा सामना रंगला होता. इतक्यात डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच एका खेळा़डूवर वीज कोसळते. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. आता हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडोनेशियातल्या मीडियाने दिलेल्या रिपोर्ट नुसार  10 फेब्रुवारीची ही घटना आहे. बान्डुंग मधल्या सिलिवांगी स्टेडिअममध्ये (Siliwangi Stadium) दोन लोकल क्लब्सदरम्यान फुटबॉलचा सामना (Football Match) रंगला होता. सामना सुरु होऊन पंधरा मिनिटं होऊन गेली होती. सामना रंगतदार होत होता. त्याचवेळी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग दाटून आले आणि त्याचवेळी पहिल्यांदा वीज कोसळली. पण यात कोणतीही हानी झाली नाही. पण पुढच्याच क्षणाला दुसऱ्यांदा वीज कोसळली. पण यावेळी थेट मैदानात एका खेळाडूच्या अंगावर ती वीज पडली. (lightning strike football player)


एका क्षणात होत्याचं नव्हतं
या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. मैदानावर फुटबॉल सामना सुरु आहे आणि खेळाडू फुटबॉलवर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांना भिडत असल्याचं या व्हिडिओ पाहिला मिळतंय. त्यावेळी एका खेळाडूच्या अंगावर अचानक वीज कोसळली. मोठा आवाज कोसळला आणि तो खेळाडू जागीच कोसळला. समोरचं दृष्य पाहून मैदानावरचे इतर खेळाडूंनी त्या खेळाडूकडे धाव घेतली. पण खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. 


खेळाडूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या खेळाडूचं वय अवघं 30 वर्ष असल्याची माहिती समोर आलीय. या घटनेनंतर सामना थांबवण्यात आला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूने संघावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 



याआधीही अशा घटना
इंडोनेशियात वीज कोसळून मृत्यूमुखी पडण्याची ही पहिलीच घटना नाहीए. याआधी 2023 मध्ये एका फुटबॉल स्पर्धेत अंगावर वीज कोसळून एका खेळाडूचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून युजर्सला चांगलाच  धक्का बसला आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. युजर्सने खेळाडूच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे.