भारताचा ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजू चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व स्तरातील लोकांनी 18 वर्षीय वर्ल्ड चॅम्पियनचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. विकास खन्ना देखील गुकेशच्या या आनंदात सहभागी झाला. यावेळी त्याने डी गुकेशचा एक जुना व्हिडीओ शेअर केला. यात 11 वर्षीय गुकेशने एका मुलाखतीदरम्यान "सर्वात तरुण जगज्जेता" बनू इच्छित असल्याची इच्छा व्यक्त केली होती. हे बोलताना त्याच्यातील आत्मविश्वास दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“प्रकटीकरणाची शक्ती,” असं सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्यावर लिहिलं आहे. 



सोशल मीडियावर फक्त डी गुकेशची चर्चा


डी गुकेशचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागला नाही, अनेकांनी विश्वास, लक्ष्य आणि कठोर परिश्रम एखाद्याच्या इच्छा आणि स्वप्नांना प्रत्यक्षात कसे बदलू शकतात हे सांगितलं आहे. .


एका इंस्टाग्राम युजरने लिहिलं की, “जर तुम्ही ते स्वप्न पाहू शकत असाल तर ते करण्याची तुमच्यात शक्ती आहे. “ती प्रकटीकरणाची शक्ती आहे. तुझे अभिनंदन, मला त्याचा अभिमान आहे,” असं आणखी एकाने म्हटलं आहे. 


तिसऱ्याने म्हटलं, त्याचे स्वप्न सत्यात आल्यावर त्याच्या डोळ्यांत आनंद पाहण्याजोगा आहे." चौथ्याने लिहिले, "स्वप्न पाहा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि विश्वावर विश्वास ठेवा."