Hit man रोहित शर्माचं T-20 मॅच न खेळण्याचं खरं कारण समोर, व्हिडिओ व्हायरल...
दोन्ही टी -२० सामन्यांमध्ये हिटमॅन रोहीतला का खेळवले गेले नाही? या प्रश्नाचे उत्तर क्रिकेट चाहत्यांना हवे आहे.
मुंबई : कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, आता टी -20 सामन्यातही इंग्लंडला घरचा रस्ता दाखवायचा असा टीम इंडियाचा निश्चय आहे. पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत दोन सामने खेळले गेले आहेत. सध्या दोन्ही संघ इंग्लंड आणि भारत 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. पण दोन्ही टी -२० सामन्यांमध्ये हिटमॅन रोहीतला का खेळवले गेले नाही? या प्रश्नाचे उत्तर क्रिकेट चाहत्यांना हवे आहे.
पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे, असे कर्णधार कोहलीने आधीच सांगितले होते. पण या मॅच दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही समजेल की, रोहित शर्मा खरोखरच विश्रांती घेत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यादरम्यान हिटमॅन रोहित शर्मा काही तरी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, रोहितने याच्यासाठी सामना खेळला नाही, असे सांगत लोक खोचक कमेंन्ट्स करत आहेत.
लोकांनी सुचवले 'वडापाव खात असावा’
तर काही म्हणत आहेत, 'वडापाव नाही चम्मच्यानी खात आहे काही तरी'
तर काहींनी, मीम मटेरियल म्हणून याकडे पाहिले.
टेस्ट सीरीज सारखंच भारतीय टीम ने टी-20 सीरीज मध्ये पहिली मॅच हरल्यानंतर शानदार come back केला आहे. पाच टी-20 मॅचच्या सीरीज मधील पहिली मॅच आठ विकेट से जिंकल्यानंतर इंग्लंड (England) ची टीम सीरीजमध्ये 1-0 ने पुढे होती. तर दुसऱ्या मॅचमध्ये भारताने पलटवार करुन सात विकेट्सनी मॅच जिंकून सीरीजमध्ये बरोबरी केली आहे.
परंतु या मॅचमध्ये लोकांनी रोहित शर्मालाच्या Batting ला खूप मिस केलं. त्यामुळे आता खाऊन झाल्यावर तरी Hit man 3ऱ्या मॅच मध्ये येऊन, आपल्या Batting ने इंग्लंडला आपला हिसका दाखवणार का? या अपेक्षेत रोहितचे फॅन्स आहेत