West Indies vs India: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI 4th T20) यांच्यात झालेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने 9 गडी राखून कॅरेबियन संघाला धूळ चारली. या सामन्यात अर्शदीप सिंह (Arshdeep Singh), कुलदीप यादव, शुभमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंनी विजयाची नौका पार केली. त्यामुळे आता भारताने मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. भारताकडून यशस्वी जयस्वालने 51 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी खेळली. तर शुभमनने 47 बॉलमध्ये 77 धावांची वादळी खेळी केली. अशातच आता बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये ( Viral Video ) अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल बोलत असल्याचं दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या, त्याविषयी शुबमन गिलने त्याला विचारलं. त्याची त्याने उत्तर दिली. आज आम्ही पाहिलं की तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आले आहेत, मग त्यांनी आधीच यायचं ठरवलं होतं का? शुभमनने असा सवाल अर्शदीपला विचारला. हा सगळं ठरलं होतं, वडील भावासोबत कॅनडाहून इथं आले होते, असं अर्शदीप सांगतो. त्यानंतर अर्शदीपने शुभमन गिलची फिरकी घेतली.


दरम्यान, तुला शॉपिंग आणि आर्ट खूप आवडतं, असं इशान किशनने सांगितलं, असं अर्शदीप म्हणतो. तुम्ही जिथं जाल तिथं काहीतरी पाहिलं पाहिजे.प्रत्येक गोष्टीशी खूप इतिहास जोडलेला आहे आणि मला ते पहायला आवडतं, असं शुभमन सांगतो. जर अमेरिकेत येऊन शॉपिंग नाही केली, तर येऊन काय उपयोग? असं म्हणत शुभमनने हशा पिकवला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


पाहा Video



दरम्यान, चौथ्या सामन्यानंतर आता पाचव्या टी-ट्वेंटी सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांची कसोटी लागणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना अतितटीचा असल्याने सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूला लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI


वेस्ट इंडीज (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (WK), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय


भारत (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.