अंपायरच्या अंगात John Cena शिरला अन्...; बॉलर विकेटसाठी अपील करताच काय झालं पाहा Video
John Cena Pose By Cricket Umpire: या सामन्यातील दुसऱ्या डावाच्या पाचव्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मैदानात असं काही घडलं की गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाजही गोंधळून गेला.
John Cena Pose By Cricket Umpire: वर्ल्ड रेसलिंग एन्टर्टेनमेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूई आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ एकमेकांपेक्षा फारच वेगळे आहेत. डब्ल्यूडब्ल्यूई ही अमेरिकेतील लोकप्रियक कुस्तीची स्पर्धा असून जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. यामध्ये 2 किंवा अनेक खेळाडू एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी लढताना दिसतात. तर दुसरीकडे क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सांघिक खेळातून विजय मिळवण्याचा उद्देश असतो. मात्र या दोन्ही खेळांची आणि खेळाडूंची लोकप्रियता प्रचंड आहे. दोन्ही खेळांमधील खेळाडू एकमेकांच्या खेळाचा फार सन्मान करतात. अमेरिकेतील काही डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू तर क्रिकेटही खेळतात. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानातही डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिनाचे चाहते आहेत याच आश्चर्य वाटण्यासारख काही नाही. मात्र कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये (सीपीएल 2023) चक्क एका पंचांनी आपलं डब्ल्यूडब्ल्यूईवरील प्रेम अनोख्या पद्धतीने दाखवलं आणि त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.
नक्की घडलं काय?
नेमकं घडलं असं की, गुयाना अॅमेझॉन वॉरिअर्स आणि ट्रॅबॅगो नाईट रायडर्स या 2 संघांदरम्यान सीपीएल 2023 चा पहिला उपांत्या सामना खेळवला जात होता. यावेळेस मैदानात पंच निगल दुगुडी स्टम्पमागे उभे होते. गुयानाचा फिरकी गोलंदाज इमान ताहिरने पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरच एलबीडब्य्लूची अपिल केली. मार्क दियाल चेंडू टोलवण्याच्या नादात असतानाच चेंडू सुटला आणि थेट त्याच्या पॅडला लागला. ताहिरने टाकलेला फूल टॉस चेंडू दियालला समजलाच नाही यावर ताहिरने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली असता पंच दुगुडी यांनी डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिनाच्या आयकॉनिक 'यू कांट सी मी' पोजप्रमाणे चेहऱ्यासमोरुन आपल्या हाताचा पंजा अनेकदा फिरवला. चेंडू टाकल्यानंतर ताहिर पंच आणि फलंदाजामध्ये आला. गोलंदाज मध्ये आल्याने आपल्याला काहीच दिसलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न पंच दुगुडी यांनी केला. यामधूनच डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिनाची पोज पंच देत असल्याचं वाटलं अन् हा सारा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला.
गोलंदाज गोंधळला अन्...
पंचांनी डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिना स्टाइलमध्ये दिलेला प्रतिसाद पाहून ताहिरही गोंधळला. मात्र नंतर पंचांनीच आपला गोंधळ झाल्याचं सांगितलं. ताहिरला फलंदाज बाद असल्याची खात्री असल्याने त्याने लगेच रिव्ह्यू मागितला आणि टीव्ही पंच लिसली रेफीर यांनी फलंदाज बाद असल्याचं जाहीर केलं. चेंडू मधल्या आणि लेग स्टम्पला आदळत असल्याचं रिव्ह्यूमध्ये निश्चित झालं. मार्क दियाल 11 चेंडूंमध्ये 15 धावा करुन तंबूत परतला. तुम्हीच पाहा हा व्हायरल झालेला व्हिडीओ...
सामम्यानध्ये चेडविक वॉल्टनने 57 चेंडूंमध्ये 80 धावा केल्याने ट्रीबॅगो नाईट रायडर्सने 18.1 ओव्हरमध्येच 7 गडी राखून सामना जिंकला. मात्र या सामन्यातील पंचांचीच ही अनोखी कामगिरी चर्चेत आहे.