मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर आऊट झाला. याआधी एबी डिविलियर्स देखील पाकिस्तानच्या विरोधात शुन्यावर आऊट झाला. या सिरीजमधले दोन्ही बलाढ्य खेळाडू शुन्यावर आऊट झाल्याने चर्चा रंगू लागल्या होत्या. पण हे का झालं याबाबत सोशल मीडियावर देखील एक वेगळा दावा केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही खेळाडूंचा वनडे रेकॉर्ड शानदार आहे. पण एका पाकिस्तानी पत्रकारसोबत सेल्फी काढल्याने दोन्ही शुन्यावर आऊट झाल्याचं सोशल मीडियावर चर्चा आहे. दुनिया न्यूज चॅनेलची स्पोर्ट्स जर्नलिस्ट जै़नब अब्बासने विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससोबत सेल्फी काढले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी तिने डिविलियर्ससोबत सेल्फी काढला होता. त्यानंतर तो शुन्यवर आऊट झाला. विराटच्या बाबतीतही तेच घडलं. सामन्याआधी सेल्फी काढल्याने विराटही शुन्यावर आऊट झाला.


विराट कोहली आतापर्यंत १८१ वनडेमध्ये ११ वेळा शुन्यावर आऊट झाला आहे.तर गेल्या ३ वर्षात तो पहिल्यांदा शुन्यावर आऊट झाला आहे.