दुबई : आशिया कपच्या स्पर्धेतील सुपर-4 टप्प्यातील सामन्यात विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 122 रन्सची स्फोटक खेळी खेळून कारकिर्दीतील 71वे शतक तर पूर्ण केलं. दरम्यान यावेळी तो सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनलाय. या मॅचमध्ये विराटच्या बॅटची बॅट चांगलीच तळपली. विराटनेही त्याच्या बॅटिंगचाही खूप आनंद घेतला. बँटींगचा आनंद घेतानाच ग्राउंडवर वाजणाऱ्या  जाणाऱ्या गाण्यावर थिरकतानाही दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

71 व्या शतकाच्या खेळीदरम्यान विराट कोहली मजेशीर पद्धतीने डान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला. विराट फलंदाजी करत असताना मैदानावर बॉलिवूड चित्रपटाचे 'सड्डी गली' गाणं वाजवलं जात होतं. हे गाणं ऐकून विराट स्वतःला थांबवू शकला नाही आणि पीचवरच तो डान्स करताना दिसला.


विराटने मैदानावर थिरकण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही कोहलीने अनेकवेळा विविध पद्धतीने त्याचे डान्स मूव्ह्स चाहत्यांना दाखवले होते. मात्र, यावेळी त्याच्या डान्सच्या नव्हे तर त्याच्या शतकाच्या चर्चा आहेत. विराटचं शतक 1020 दिवसांनंतर पूर्ण झालं आहे. याआधी 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सामन्यात विराटने 70 वे शतक झळकावलं होतं.



या सामन्याबद्दल बोलताना केएल राहुलने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय टीमटं नेतृत्व केलं. अफगाणिस्तानने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने डावाची सुरुवात केली. विराटने 122 रन्स केले, तर केएल राहुलने 62 रन्स करत चांगली खेळी केली. भारतीय टीमचा स्कोर 212 होता. 213 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची टीम केवळ 111 रन्सच करू शकली आणि 101 रन्सने सामना गमावला.