विराटने केली सचिनच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इंनिग 187 रनवर ऑलआऊट झाली.
जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इंनिग 187 रनवर ऑलआऊट झाली.
टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाला काही खास करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेला देखील सुरुवातीला पहिला झटका लागला.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 54 रन केले. कोहलीने यासोबतच सचिनच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे. जोहान्सबर्गच्या पहिल्या इनिंगमध्ये 10 रन करत कोहलीने त्याच्या टेस्ट करिअरमधले दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील सिरीजमध्ये 200 रन पूर्ण केले आहे. कोहली दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात एका टेस्ट सीरीजमध्ये 200 रन करणारा दुसरा आशियाई कर्णधार ठरला आहे.
सीरीजमध्ये 200 रन करण्याचा कारनामा भारतीय टीमचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावे होता. तेंडुलकरने 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कर्णधार म्हणून 200 रन केले होते. सचिननंतर विराटने त्याची बरोबरी केली आहे.