मुंबई : भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं अखेर लग्नबंधनात अडकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ नोव्हेंबर रोजी हे दोघेही रजिस्टर मॅरेज पद्धतीने विवाहबद्ध झाले. रात्री त्यांनी पार्टी केली. यावेळेस दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार सहभागी होते.  


गुरूवारी लग्न आणि छोटेखानी पार्टी झाल्यानंतर  सागरिका आणि झहीर खाने मुंबईतील हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये भव्य रिसेप्शन सोहळा ठेवला होता. 



सितार्‍यांची मांदियाळी 


सागरिका आणि झहीर खानच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडचे आणि क्रिकेट विश्वातील सितारे हजर होते. 
या रिसेप्शन सोहळ्यात अनेकांच्या नजरा विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर खिळल्या होत्या. या दोघांनी सागरिका आणि झहीरच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली.  


काही दिवसांपूर्वी एका चॅट शोमध्ये सहभागी झाल्यानंतर विराट कोहलीने झहीर खानचा उल्लेख 'लव्ह गुरू' असा केला होता.  


 


सागरिकाचा 'रॉयल लूक' 


सागरिकाचा ड्रेस सब्यसा ने डिझाईन केला होता. तिनं गोल्ड क्रिम रंगाचा खास बनारसी लेहंगा घातला होता. सोबत सागरिकाने सोन्याचे दागिने घतले होते. 


सागरिकाप्रमाणेच झहीर खानची शेरवानी निळ्या रंगांची होती.  निळ्या कुडर्त्याला क्रीम रंगाचा चुडीदार घातला होता.