एबीच्या निवृत्तीचा कोहलीला धक्का? 3 दिवसानंतर प्रतिक्रिया
एबीच्या निवृत्तीवर विराट अखेर बोलला
मुंबई : आधुनिक क्रिकेटमध्ये 'विविध शॉट्सचा आविष्कार' करणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने 23 मेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच्या अचानक निवृत्तीने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. 'सुपरमॅन', 'मिस्टर कूल' और 'मिस्टर 360 डिग्री' यासारखी विशेषण आपल्या नावापुढे मिळवणारा डिविलियर्स आता त्या काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत ज्यांचं कौतूक फक्त त्यांच्याच देशातले प्रशंसक नाही तर जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी करतात. डिविलियर्सने निवृत्तीची घोषणा करताच अनेकांनी त्याला पुढच्या वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डिविलियर्स निवृत्त झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या प्रतिक्रियेची अनेकांना प्रतिक्षा होती. अखेर विराट कोहलीने त्यावर प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीने एबी डिविलियर्सच्या निवृत्तीवर 3 दिवसानंतर प्रतिक्रिया दिली. एबी डिविलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील बंगळुरु टीममध्ये खेळायचा. डिविलियर्स आणि विराटमध्ये यादरम्यान खूप चांगली मैत्री झाली. एबीचं अनेकदा त्यानं कौतूक केलं आहे.
विराट कोहली आणि एबी डिविलियर्सची मैत्री अनेकदा मैदानावर देखील पाहायला मिळते. डिविलियर्सने आयपीएल 2018 मध्ये 6 अर्धशतक केली. 12 सामन्यांमध्ये त्याने एकूण 480 रन केले. आयपीएलच्या संपूर्ण करिअरमध्ये डिविलियर्सने एकूण 141 सामने खेळले. ज्यामध्ये 3 शतक आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 3953 रन केले.
विराटने ट्विट केलं की, माझा भाऊ, तू जे ही करशील त्यासाठी तुला शुभेच्छा. इंटरनॅशनल क्रिकेट खेळतांना तू फलंदाजीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलास. भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुला आणि तुझा परिवाराला खूप-खूप शुभेच्छा.