मुंबई : ब्रेकफास्ट विथ चॅम्पियंस या कार्यक्रमामधून क्रिकेटर विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. गौरव कपूरने विराटची ही खास मुलाखत घेतली आहे.  
 
विराट हा तरूण आणि धडाकेबाज खेळाडू आहे. त्यामुळे तो जितकी धमाल पीचवर करतो तितकीच ड्रेसिंगमध्ये करतो. त्यामुळे विराटने हार्दीक पांड्याचा एक खास किस्सा शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या म्हणण्यानुसार, 'ड्रेसिंग रूममध्ये प्रामुख्याने पंजाबी गाणी वाजतात. खेळाडूंना प्रामुख्याने हीच गाणी आवडतात. सारे खेळाडूच ड्रेसिंगरूममध्ये त्यांचा आयपॉड आणत नाहीत. पण हार्दिककडे अनेकदा असतो. त्याच्या आयपॉडमध्ये अनेकदा इंग्रजी गाणी असतात. पण एकाही गाण्यातील पाच शब्द त्याला ठाऊक नसतात. त्याला फक्त गाण्याचा ताल ठाऊक असतो. पण ही गोष्ट आमच्यासाठी कंटाळवाणी असते. माझ्या आयपॉडमध्ये प्रामुख्याने पंजाबी गाणी असतात. क्वचित हिंदी रोमॅंटिक गाणी असतात. ' 



 


विराटने या मुलाखतीमध्ये हार्दिक बाबत अजून एका गोष्टीचा खुलासा केला आहे. हार्दिक मनाने साफ आहे. पण तो बोलण्यापूर्वी विचार करत नाही. त्यामुळे अनेकदा तो काहीतरी चुकीचं बोलतो. 


हार्दीक पांड्या हा युवा आणि ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याचे टॅटू, हटके हेअरस्टाईल्स आणि हेअर रंगवण्याची खास स्टाईल यामुळे भारतीय संघामध्ये त्याच्यामुळे नवचैतन्य राहते.