VIDEO : शून्यावर आऊट होऊनही धोनीच्या पुढे गेला विराट कोहली
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या ५ वनडे सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या गेलेल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.
नवी दिल्ली : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या ५ वनडे सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या गेलेल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.
या सामन्यात केवळ पाच बॉल खेळून विराट आऊट नाथन कूल्टरच्या बॉलवर एकही रन न काढता आऊट झाला. या सामन्यात क्लूटरने टीम इंडियाच्या पहिल्या तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. यावेळी टीम इंडियाचा स्कोर ५ विकेट गमावून ८७ रन्स असा होता. मात्र, नंतर महेंद्र सिंह धोनी आणि हार्दिक पांड्याने जबाबदारी घेत टीमला विजय मिळवून दिला.
विराट कोहली या सामन्यात शून्यावर आऊट झाला आणि धोनीने ७९ रन्सची महत्वाची खेळी केली. तरीही विराट धोनीच्या पुढे निघून गेलाय. ऑस्ट्रेलियाला चेन्नई वनडे सामन्यात पराभूत केल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग १०वा विजय आहे. तर धोनी विराटच्या एक पाऊल मागे आहे. धोनी कर्णधार असताना टीमने ९ वनडे सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवला आहे.
तसेच विराट कोहली हा सर्वात वेगवान ५० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणा-या कर्णधारांच्या यादीत दुस-या क्रमांकावर आला आहे. त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटींग आहे. पॉंटींगने ६३ सामन्यांमधील ५० सामन्यांमध्ये विजय मिळवला. तेच पहिल्या ५० विजयांसाठी कोहलीने ७० सामने खेळले.
धोनीच्या नावावर कर्णधार म्हणूण हे रेकॉर्ड
महेंद्र सिंह धोनी भारतीय क्रिकेट टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. धोनी एका एकुलता एक असा कर्णधार होता, ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी म्हणजेच टी-२० वर्ल्ड कप, २०११ आयसीसी वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या आहेत.
धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. यातील ४१ सामने टीमने जिंकले आहेत. एका कर्णधार म्हणूण सर्वात जास्त टी-२० सामने जिंकण्याचा रेकॉर्डही धोनीच्याच नावावर आहे. धोनीनंतर या यादीत दुस-या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा डॅरन सॅमी हा आहे. त्याने कर्णधार म्हणून २७ सामने खेळले आहेत.