पाकिस्तान : विराट कोहलीचे चाहते काही कमी नाहीत. केवळ भारतच नाही तर इतर अनेक देशांमध्ये कोहलीचे चाहते आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये पाकिस्तानही अपवाद नाही. पाकिस्तानातही विराटचे चाहते आहेत याची प्रचिती नुकतीच आली. पाकिस्तान सुपर लीग खेळवली जात असून यावेळी प्रेक्षकांच्या गर्दीच चक्क विराट कोहलीच्या फोटोचं पोस्टर झळकताना दिसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टरवर विराट कोहली टीम इंडियाच्या जर्सीमध्ये शॉट खेळताना दिसतोय. या पोस्टवर चाहत्याने त्याची इच्छाही व्यक्त केली आहे. विराटने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गेल्या 2 वर्षांपासून शकतं झळकावलेलं नाही. अशातच या चाहत्याने 71 व्या शतकाची विराटकडे इच्छा व्यक्त केली आहे.


या चाहत्याला विराटचं 71वं शतकं पाकिस्तानच्या धर्तीवर हवं आहे. त्याने पोस्टरवर लिहिलंय की, मी तुमचं शतकं पाकिस्तानमध्ये पाहू इच्छितो. हॅशटॅग पीस.


मात्र विराटच्या या चाहत्याची इच्छा पूर्ण होणं फार कठीण आहे. गेल्या एका दशकापासून जास्त काळ भारत-पाकिस्तान यांच्यात सिरीज झालेली नाही. दोन्ही सामने केवळ आयसीसीच्या टूर्नांमेंट्समध्येच आमने सामने येतात. 


भारताने 2008मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी गेली होती. मात्र त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा भाग नव्हता.