लोणच्या ऐवजी चुकून `झुरळ` खाणार होता विराट, नेमका काय आहे किस्सा? हसून हसून तुमच्याही पोटात दुखेल
विराट कोहली चुकून दुपारच्या जेवणात लोणचं समजून झुरळ खाणार होता. विराट कोहलीने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
Virat Kohli Cockroach Incident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेसबाबत खूप जागृत असतो. विराट फिटनेस फ्रिक असल्याने तो आपल्या खाण्यापिण्याबाबत जास्त सजग असतो. 35 वर्षांच्या विराट कोहलीच्या फिटनेसची चर्चा जगभरात आहे. पण तुम्हाला माहितीये का की एकदा विराट कोहली चुकून दुपारच्या जेवणात लोणचं समजून झुरळ खाणार होता. विराट कोहलीने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता विराट कोहली बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी उतरणार आहे. 19 सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये पहिला सामना खेळवला जाईल. तर 27 सप्टेंबर रोजी दुसरा टेस्ट सामना पार पडेल. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये एक किस्सा सांगितला होता यात त्याने सांगितले की तो एकदा चुकून जेवणात झुरळ खाणार होता.
2016 मध्ये विराट कोहलीने हा किस्सा सांगितला होता. तो ‘Wrong’ ब्रँड प्रमोट करण्यासाठी आला असताना मुलाखती दरम्यान त्याने हा किस्सा सांगितलं. विराटने सांगितले की एकदा तो मलेशियाच्या ट्रिपवर केला होता. यावेळी त्याच्याकडून एक मोठी चूक होणार होती. विराटने म्हंटले की काही कारणास्थव मलेशिया ट्रिप दरम्यान तो 28 तास झोपला नव्हता. जेव्हा तो एका रेस्टोरेंटमध्ये दुपारी जेवणासाठी पोहोचला तेव्हा तो लोणचं समजून झुरळ खाणार होता. तेव्हा कोणीतरी त्याला सांगितले की, तो झुरळ खातोय आणि तेवढ्यात विराट थांबला.
बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया :
रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
टीम इंडियाचं वेळापत्रक :
बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिली टेस्ट चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.