Virat Kohli : खुन्नस देणाऱ्या नवीनला विराटने प्रेमाने जिंकलं, प्रेक्षकांनी डिवचलं पण कोहलीने रोखलं; पाहा Video
Naveen Ul Haq hugs Virat Kohli : इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 हंगामात त्यांच्या शाब्दिक वादानंतर भारतीय फलंदाज विराट कोहलीने अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकची गळाभेट घेतली.
Virat Kohli Viral Video : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील 9 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात (Arun Jaitley Stadium) पार पडला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) हे दोन संघ आमने सामने होते. मात्र, सर्वांना प्रतिक्षा होती विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल हक (Naveen-Ul-Haq) यांच्यातील वाकयुद्धाची... विराट आणि नवीन समोरासमोर आले खरे.. नजरेला नजर भिडली पण यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. दिल्लीकरांनी नवीनला डिवचण्याचा प्रयत्न केला पण विराटने त्यांना रोखलं. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. अनेकांनी विराटच्या या कृतीचं कौतुक केलंय.
नेमकं काय झालं?
अफगाणिस्तानने दिलेल्या 273 धावांचं आव्हान पार करताना भारताचा सलामीवीर कॅप्टन रोहित शर्मा याने खणखणीत शतक ठोकलं. 84 बॉलमध्ये रोहितने 131 धावांची खेळी केली. रोहितने टीम इंडियाला विजयाच्या रुळावर आणून ठेवलं. त्यानंतर विराट कोहलीने उरलेलं काम केलं अन् भारताचा विजय निश्चित केला. विराट आल्यावर नवीन-उल-हकला धुणार अशी शक्यता वाटत होती. मात्र, विराट टिकून खेळला. त्याने सिंगल धावास घेण्याचा मानस धरला. त्यावेळी रोहितचा खेर 4 थ्या स्थितीत होता. रोहित बाद झाल्यानंतर विराटने घाई केली नाही. विराट मैदानात असताना नवीनने तीन ओव्हर केल्या. त्यावेळी दिल्लीच्या क्राऊडने विराट विराटचा नावाची गर्जना केली अन् नवीनला डिवचण्याचा प्रयत्न केला.
विराटला ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने हातवारे करत प्रेक्षकांना घोषणा न देण्याचा सल्ला दिला. त्यावेळी क्राऊड शांत झालं. विराटची ही कृती पाहून नवीनचं देखील काळीज पिघळलं. नवीनने विराट कोहलीची गळाभेट घेतली. हा क्षण पाहून प्रेक्षकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही.
पाहा Video
अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.